Fem Time- All Issues
मागील पंधरा ते सोळा वर्षांमध्ये मी जवळ जवळ बऱ्याच इंश्युरन्स, इन्व्हेस्टमेंट, बँकिंग, फायनान्स, शेयर मार्केट, टॅक्स आणि रियल इस्टेट या क्षेत्रात काम करीत असलेल्या कंपनी आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निगडित असलेल्या लोकांच्या संपर्कात आलो. त्यांच्या काय अडचणी आहेत? त्यांना काय हवे आहे? ग्राहकांची गरज काय आहे? असंख्य प्रश्न आणि त्यांची उत्तरे प्रत्यक्ष चर्चे द्वारे आणि परिसंवादाच्या माध्यमातून समजली. मला मनापासून वाटते कि हि सर्व माहिती प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेची आहे. हजारो पुस्तकांच्या माध्यमातून उपलब्ध असलेली माहिती एका पुस्तकाद्वारे प्रकाशित करणे अयोग्य ठरेल, म्हणून नियमित मासिकाद्वारे तुमच्या समोर मांडण्याचा निर्णय घेतला. सर्वात पहिली अडचण आली भाषा माध्यम? बऱ्याच गोष्टी, संदर्भ, प्रत्येक क्षेत्राची अभ्यासपूर्ण माहिती आपल्या मातृभाषेत (मराठी) खूप कमी प्रमाणात उपलब्ध होती. इंग्लिश म्हटले कि बऱ्याच लोकांच्या सतरा माळे वरून जाते. भरपूर लोकांच्या भेटी घेतल्या आणि मराठी भाषेतून मासिक प्रकाशित करण्याचा निर्णय झाला. एक टप्पा पार पडला, पण खरी जबाबदारी पुढे आ वासून उभीच होती, मजकूर (कंटेंट) ? इतक्या मोठ्या माहितीच्या समुद्रात सूर मारून शिम्पले शोधण्याची मोहीम, खरंच किसी एक आदमी का काम नही. वरील सर्व क्षेत्रांशी निगडित, शैक्षणिक तसेच व्यावहारिक जगात मातब्बर असलेल्या व्यक्तींना भेटून त्यांनाही या मोहिमेत सहकारी बनवून घेतले. त्यांचे लेख, विचार आणि या क्षेत्रातील असलेले त्यांचे ज्ञान तुमच्या आणि आमच्या साठी पर्वणीच ठरेल. असो ! साध्या आणि सोप्या भाषेत तुमच्या समोर आम्ही घेऊन येत आहोत "फेम" टाईम ऑफ फर्स्ट इन्व्हेस्ट मॅनेजमेंट, टप्या टप्याने या क्षेत्रातील सर्व विषय हाती घेणार आहोतच. मनापासून एक नम्रविनंती करतो, आपल्या मित्र परिवार यांनाही आपल्या "फेम" टाईम मासिकाचे नियमित सदस्य होण्यास प्रोत्साहित करावे. प्रिय वाचक आपले प्रश्न, सूचना, आणखी काय समाविष्ट असायला हवे या विषयी आपण आम्हाला femtime.in@gmail.com यावर ई-मेल वर पाठवू शकतात. आपला नम्र संपादक